Thursday, February 10, 2011

ऊर्मिला करतेय 'इमेज ब्रेक...'


"मला आई व्हायचंय' चित्रपट नेमका काय आहे ?
- खूप वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा विषय "सरोगसी' (उसनं मातृत्व) हा आहेहा खूप वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा विषय "सरोगसी' (उसनं मातृत्व) हा आहे. "सरोगसी'वर या आधी चित्रपट झाला नव्हता. यातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलाय, की वैज्ञानिक प्रगतीमुळे मूल न होणाऱ्यांसाठी "सरोगसी' हाही एक मार्ग आहे. त्यामुळे मूल होण्यासाठी स्त्री-पुरुषाने एकत्र आलं पाहिजे असं नाही.पण त्याचबरोबर मानवी भावभावना आहेतच. "सरोगसी' कशी करतात यावर आधारीत एक छोटा "व्हिडीओ' चित्रपटाच्या आधी दाखवला आहे.

यात तुझी भूमिका काय आहे ?
- यात एका आईची भूमिका मी करतेय. माझ्यासाठी ती आव्हानात्मक भूमिका होती. या भूमिकेसाठी मला खूप तयारी करावी लागली. त्याचबरोबर ही व्यक्तिरेखा नागपूरकडची आहे, त्यामुळे वऱ्हाडी लहेजाही मला शिकायला लागला.

या चित्रपटांत एक अमेरिकन मुलगा काम करतोय, त्याच्याबद्दल काय सांगशील ?
- हो, त्या मुलाबरोबरचे माझे "सीन्स' खूप छान आहेत. तो मराठी छान बोललाय. शूटिंगच्या आधी काही दिवस त्याच्याबरोबर आम्ही सराव केला, त्याच्याशी मैत्री केली. एकूण अनुभव छान होता. आमचं "क्‍यूट' असं नातं तयार झालं होतं.